आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले. राज ठाकरेंनी लालबागच्या राजाच्या दर्शन घेतलं. त्यानंतर त्याठिकाणाहून राज ठाकरे बाहेर पडत असताना राज ठाकरेंसोबत फोटो काढण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी चाहत्यांची सेल्फीची इच्छा पूर्ण केली. .
राज ठाकरे लालबागच्या राजाच्या मंडपातून जेव्हा बाहेर पडू लागले, तेव्हा सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांसोबत त्यांनी काही वेळ चर्चा केली. राज ठाकरेंना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्ते आणि पोलिसांनी एक मानवी साखळी तयार केली होती. यावेळी एका तरुणाने सेल्फीसाठी राज ठाकरेंनी विनंती केली. राज ठाकरेंनीही ती मान्य केली.
हे ही वाचा : शिंदे गटाचा राष्ट्रवादीला धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यासह हजार पदाधिकारी-कार्यकर्ते उद्या शिंदे गटात
यानंतर एक चिमुरड्यासह असलेल्या एका व्यक्तीनेही राज ठाकरेंसोबत फोटो काढण्याची इच्छा बोलून दाखवली. असे अनेक जण राज ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडतच होते. पण राज ठाकरेंनी यादरम्यान कुणालाही निराश केले नाही.
दरम्यान, फोटोसाठी विचारलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या चिमुरड्याला राज ठाकरे यांच्या पत्नीने उचलून घेतलं. त्यानंतर राज ठाकरेंनी पोझ देत लालबागच्या राजाला दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्ताची सोबत फोटो काढण्याची इच्छा पूर्ण केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिंदे गटाचा शिवसेनेला पुन्हा दणका; ‘या’ आक्रमक महिला नेत्या करणार शिंदे गटात प्रवेश?”
सदस्य संख्या इतकी वाढवा की…; उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन