Home महत्वाच्या बातम्या मुंबै बँकेवर भाजप-राष्ट्रवादीची सत्ता; भाजपाकडे अध्यक्षपद तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद

मुंबै बँकेवर भाजप-राष्ट्रवादीची सत्ता; भाजपाकडे अध्यक्षपद तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. अशातच महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे.

मुंबै बँकेत सत्तांतर झालं असून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची मुंबै  बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे.

हे ही वाचा :  हिंमत असेल तर महापौरांची निवड जनतेतून करा; मनसेचा शिंदे सरकारला इशारा

सहा महिन्यांपूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन दरेकर यांची अध्यक्षपदाची संधी हिसकावून घेतली होती. यावेळी संचालक पदी सिंद्धार्थ कांबळे यांची निवड करण्यात आली होती.

दरम्यान, मुंबै बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात अध्यक्षपदाचा तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता अध्यक्षपदी प्रवीण दरेकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“बंडखोरीमुळे शिवसेनेच्या ताकदीत वाढ; लोहारा-उमरगा तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”

सांगलीतील एकमेव ग्रामपंचायतीवर रोहित आर. आर. पाटलांनी विजयी गुलाल उधळला; भाजप खासदाराचं डिपाॅझिट जप्त

“धाराशिवमध्येही शिवसेनेचा भगवा फडकला; 13 पैकी 12 जागांवर मारली बाजी”