आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडली असून गोरेगावाच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली असून काल रात्री ईडीनं संजय राऊत यांना अटक केली. यावरून आता भाजप आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बिल्डरांकडून आणि व्यवसायिकांकडून अवैध पैसा गोळा केला आणि मोठा भ्रष्टाचार केला. याशिवाय महाविकास आघाडी सरकारची स्थापना करण्यासाठी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही मोठी रक्कम घेतली होती, असा आरोपही रवी राणा यांनी यावेळी केला.
हे ही वाचा : “अखेर संजय राऊत यांना ईडीकडून अटक, महिलेला धमकावल्याप्रकरणी पोलिसात FIR दाखल”
दरम्यान, संजय राऊत यांच्याप्रमाणेच शिवसेना नेते व मंत्री अनिल परब यांनीही अनेक घोटाळे केले आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे राऊतांपाठोपाठ परब यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याचं रवी राणा यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकिय चर्चांना उधाण
“शिवसेनेत इनकमिंग सूरूच; घोडबंदर परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
“आता शिवसेनेत दिघे राज चालणार; आनंद दिघेंच्या पुतण्याला उद्धव ठाकरेंनी दिली ‘ही’ मोठी जबाबदारी”