आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांना माफिया म्हटलं होतं. यावरून शिंदे गटातील काही आमदारांनी सोमय्यांना धारेवर धरलं. अशातच आता शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी एक मोठं विधान केलं आहे .
उद्धव ठाकरे यांनी आम्हांला सन्मानाने बोलावलं, तर आम्ही मातोश्रीवर परत जाऊ, आम्हांला मातोश्रीवर परत जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही बोलणार नाहीत, असं विधान संतोष बांगर यांनी यावेळी केलं.
हे ही वाचा : बाळासाहेबांचा सन्मान म्हणत, नोटीस न बजावणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंचं जोरदार उत्तर, म्हणाले…
दरम्यान, मातोश्रीवर आमचं प्रेम अद्याप कायम आहे. जर काही लोक मातोश्रीवर चिखलफेक करत असतील तर आमचे मुख्यमंत्री देखील शांत बसणार नाहीत, असं म्हणत बांगर यांनी सोमय्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंची लवकरच भेट घेणार; महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
“एकनाथ खडसेंची अवस्था म्हणजे, मंदिरात गेले तर प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला”
शिंदे गटातील प्रवक्ते व आमदारांची उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती; दीपाली सय्यद यांचं ट्विट