Home उस्मानाबाद उद्धव ठाकरे घाबरू नका, गद्दारांना जशास तसं उत्तर द्या; अजित पवारांकडून ठाकरेंना...

उद्धव ठाकरे घाबरू नका, गद्दारांना जशास तसं उत्तर द्या; अजित पवारांकडून ठाकरेंना संघर्षाचा दाखला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

उस्मानाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. आणि शिंदेंनी भाजपसह सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेनेत आता 2 गट पडले आहेत. एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा, तर दुसरा उद्धव ठाकरेंचा. यामुळे या दोन्ही गटात धनुष्यबाण कोणाला मिळेल, यासाठीही स्पर्धा सुरू आहे. या प्रकरणावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

सत्तेचे गणित वेगळे आहे. कुण्या एकाच्याच हाती सत्ता राहिल असे नाही, पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी हुरळून जाऊ नये आणि ज्यांनी सत्ता उपभोगली नाही त्यांनी खचून कधी जाऊ नये. सध्या शिवसेना आणि पक्ष प्रमुखांवर अडचण आहे. पण यामुळे खचून न जाता संघर्षाची तयारी ठेवणे गरजेचं असल्याचं म्हणत अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या या मोठ्या नेत्याने घेतली अमित शहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

बंडखोर आमदार हे सत्तेत असले तरी ते कायम सत्तेतच राहतील असे नाही. गद्दारांना लोक स्विकारत नाहीत, हा इतिहास आहे. यापूर्वी नारायण राणे यांनी शिवसेनेतून बंड केले त्यांना जनतेने नाकारलेच. ज्या गावच्या बोरी त्या गावच्याच बाभळी, त्यामुळे जशाच तसे उत्तर देण्याची तयारी ठेवणे गरजेचं असल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजप युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मोठी बातमी! राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना सहभागी होणार?; नाना पटोलेंनी दिलं महत्वाचं उत्तर, म्हणाले…

उद्धव ठाकरेंचा वंचित आघाडीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार शिवसेनेत प्रवेश