Home महाराष्ट्र शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांनी जोर धरला असता, मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, म्हणाले…

शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांनी जोर धरला असता, मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, म्हणाले…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. आणि शिंदेंनी भाजपसह सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेनेत गळती सूरू झाली. अशातच शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटलांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात सामील होतील, असा दावा केला होता.

गुलाबराव पाटलांच्या या विधानानंतर राज्यातील अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. या चर्चा सुरू असताना मिलिंद नार्वेकर कुठे आहेत? असा सवाल उपस्थित केला गेला. यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केलं आहे.

मी भाग्यवान आहे की, मला सरन्यायाधीश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्यासमवेत श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या पाचव्या दिवशी गरुड वाहन पुजेचा साक्षीदार होता आलं., असं नार्वेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरे घाबरू नका, गद्दारांना जशास तसं उत्तर द्या; अजित पवारांकडून ठाकरेंना संघर्षाचा दाखला

राष्ट्रवादीच्या या मोठ्या नेत्याने घेतली अमित शहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजप युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश