“संजय राठोडांच्या बाजूने उभा राहणारा बंजारा समाज आता ठाकरेंना साथ देणार, लवकरच मातोश्रीवर जाऊन बांधणार शिवबंधन”

0
522

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या घडामोडीनंतर अनेक पक्षातील नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे.  अशातच शिवसेनेचं बळ आणखी वाढणार आहे.

शिंदे गटातील मंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना मोठा धक्का बसणार आहे. संजय राठाडोंच्या नेहमी पाठीशी उभा राहणारा बंजारा समाज आता उद्धव ठाकरेंना साथ देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : भाजपाला आम्ही फारसं महत्व देत नाही; मनसेच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

दरम्यान, राज्यातील 50 ते 60 टक्के बंजारा समाजाच्या बांधवांनी संजय राठोड यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बंजारा समाजाने शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येत्या 2-3 दिवसात बंजारा समाजाचे लोक मातोश्रीवर जाउन शिवबंधन हाती बांधणार असून ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचे संकेत

राज ठाकरेंनी दिला कार्यकर्त्यांना कानमंत्र, म्हणाले, … तर विजय आपलाच…”

…तर उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा; नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here