Home महाराष्ट्र मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचे संकेत

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचे संकेत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या घडामोडीनंतर अनेक पक्षातील नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा चर्चा आता सूरू झाल्या आहेत. यावर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भविष्यात बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे जर एकत्र येत असतील तर आनंदाची गोष्ट आहे., असं सावंत म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : राज ठाकरेंनी दिला कार्यकर्त्यांना कानमंत्र, म्हणाले, … तर विजय आपलाच…”

आज भारताचे संविधान हे डॉक्टर बाबासाहेबांची मोठी देणगी आहे. या संविधानावर हल्ला होत आहे. खरंच लोकशाही शिल्लक आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच आज अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून आता ज्यांना वाटतं, की भारताचे संविधान सुरक्षित व्हावं, देशाची जातीय अवस्था निर्मूलन होवून न्याय व्यवस्था उभी राहावी. मग ती सामाजिक न्यायाची असो, आर्थिक न्यायाची असो, शैक्षणिक न्यायाची असो, यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं सावंत म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…तर उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा; नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला मैत्रीचा हात पुढे; ठाकरे देणार प्रतिसाद?”

राज ठाकरेंना भेटण्यासाठी चिमुकला राहिला उपाशी; राज ठाकरेंनी पुरविला बालहट्ट