आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
राज्यपालांनी 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलावले असून महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : उद्या मुंबईत येतोय, बहुमत चाचणीला हजर राहणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
भाजपकडून राज्यघटनेच्या चिंधड्या उडवल्या जात असल्याचं सांगत राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असल्याची उपरोधिक टीका संजय राऊत यांनी केली.
आमदारांच्या अपात्रतेचा मुद्या सुप्रीम कोर्टात असताना दुसरीकडे बहुमत चाचणीचे आदेश देणे चुकीचं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, शिवसेना या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. सुप्रीम कोर्टाकडून आशा असल्याचंही राऊत यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमागचा खरा सूत्रधार कोण?; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं नाव, म्हणाले…
भाजपमध्ये हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल
मोठी बातमी! म्हैसाळमधील 9 जणांच्या आत्महत्याप्रकरणी मोठा खुलासा!