आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : पुणे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांचे सुपूत्र रूपेश यांच्या नावाने चिट्ठी आली असून सावध रहा रूपेश, असा मजकूर त्या चिठ्ठीत लिहिण्यात आला आहे. या प्रकरणात भारती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
हे ही वाचा : सदाभाऊ, आधी हाॅटेलची उधारी द्या, मग पुढे जावा; सांगोलात हाॅटेल चालकानं सदाभाऊंचा ताफा अडवला
मुलगा म्हंटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हंटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो…आमचेही अगदी तसंच आहे,पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही… राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही…गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते,पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललच पाहिजे…साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली, त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफर मध्ये “सावध रहा रुपेश” आशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली…तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असे का ? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय…आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबा बाबतीत असा विचार करायचा ?हे का तेच कळत नाही… भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत…तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय…बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत ( तात्या ) मोरे आहे…!, असं वसंत मोरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“काँग्रेसची मोठी खेळी; ‘या’ विधानपरिषद निवडणूकीत भाजपला दिला पराभवाचा धक्का”
“…मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का?”; मनसेचा सवाल
गोपाळकृष्ण शाळेत मोठ्या दिमाखात ‘ प्रवेशोत्सव ‘ साजरा