Home महाराष्ट्र शिवसेना म्हणजे अंगार, आगीशी कोण खेळणार असेल तर…; भास्कर जाधवांचा इशारा

शिवसेना म्हणजे अंगार, आगीशी कोण खेळणार असेल तर…; भास्कर जाधवांचा इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आज बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ज्याच्या खांद्यावर मान ठेवली त्यांनी केसाने गळा कापला. शिवसेनेने आधीच मित्रपक्ष वाढवले असते तर आज भाजपने केलेल्या विश्वासघाताच दुःख वाटलं नसतं, अशी खंत भास्कर जाधव यांनी यावेळी व्यक्त केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जयंत पाटलांसोबत, भाजपच्या ‘या’ 2 आमदारांची उपस्थिती; चर्चांना उधाण

शिवसेना अंगार आहे, आगीशी कोणी खेळणार असेल तर खेळणाऱ्याची राजकीय कारकीर्द जळून खाक होईल. संभाजी बिग्रेड आणि शिवसेना युतीचा भाजपने धसका घेतला आहे. 25 ते 30 वर्ष शिवसेनेने एकाच पक्षाच्या खाद्यावर विश्वासाने ठेवली होती. मात्र केसाने गळा कापण्याचे काम मित्र पक्षाने केलं, अशी अप्रत्यक्ष टीका भास्कर जाधवांनी भाजपवर केली.

दरम्यान, शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना म्हणजे विनाशकालीन विपरीत बुद्धी असं म्हणत टीका केली होती. यालाही भास्कर जाधवांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. आम्हाला विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या फडणवीसांच्या पक्षाने आजवर अनेकांशी युती केली आणि दगा दिला. मात्र, शिवसेना एकासोबत कायम राहिली. त्यांच्या सारखा आम्ही मित्र पक्षांना दगा दिला नाही, असं प्रत्युत्तर भास्कर जाधवांनी यावेळी फडणवीसांना दिलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सूरूच; गुलाम नबी आझादनंतर आता ‘या’ मोठ्या नेत्यानं दिला राजीनामा

शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंकडून खासदार नवनीत राणांचा खरपूस समाचार, म्हणाल्या, याचं दार, त्याचं दार, बाई माझ्या…

“कोल्हापूरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”