Home महाराष्ट्र राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदाराला मनसेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदाराला मनसेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत बोलताना, मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. तसेच राज ठाकरे या दाैऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत. यावरून आता भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया देत राज यांच्या अयोध्या दाैऱ्यास विरोध केला आहे.

उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी., अशी मागणी ब्रीजभूषण यांनी यावेळी केली. तसेच राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत योगी आदित्यनाथ यांनी त्यांना भेटू नये, असंही ब्रीजभूषण यांनी यावेळी म्हटलं. यावरून आता मनसेनं पलटवार केला आहे.

हे ही वाचा : डोंबिवली ग्रामीणमध्ये शिवसेनेचा मनसेला खिंडार; मनसेचे दोन नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार?

धमकी कुणी दिली याचं काही महत्त्व आहे की नाही? अशा धमक्यांना मनसे, महाराष्ट्र सैनिक आणि स्वत: राज ठाकरे भीक घालत नाहीत. राज ठाकरेंबद्दल बोललो की प्रसिद्धी मिळते. त्यांना ती प्रसिद्धी मिळाली आहे. पण हे झाल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन गेलेला आहे आणि गप्प बसा सांगितलं आहे., असं अभिजीत पाणसेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांनी फडणवीसांवर केलेल्या ‘या’ आरोपावर रामदास आठवलेंंची प्रतिक्रिया, म्हणाले…

आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच राज ठाकरेंना त्रास सुरू झाला; शिवसेनेचा हल्लाबोल

“हैदराबाद हादरलं! मुस्लीम तरूणीशी लग्न केलं म्हणून हिंदू तरूणाची हत्या; तरूणी म्हणाली, माझ्या डोळ्यासमोर…”