Home महाराष्ट्र 40 गेले मात्र आता भगव्याच्या 100 शिलेदारांना निवडून आणू; शिवसेनेचा बंडखोरांना इशारा

40 गेले मात्र आता भगव्याच्या 100 शिलेदारांना निवडून आणू; शिवसेनेचा बंडखोरांना इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यानंतर शिवसेनेकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका होत आहे. अशातच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही आता शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

रत्नागिरीचा उपरा आणि सिंधुदुर्गातील तो बाडगा, दोन्ही शिवसेनेचे बाडगा आणि कोडगा यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. आणि बेशरमपणे सांगतात आम्ही शिवसेनेतच आहोत. दुसऱ्यांचे बाप शोधणारे आता भाजपसमोर लोटांगण घालत आहेत, असा हल्लाबोल विनायक राऊतांनी उदय सामंत व दीपक केसरकर यांच्यावर केला.

हे ही वाचा : बाळासाहेबांचा सन्मान म्हणत, नोटीस न बजावणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंचं जोरदार उत्तर, म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना खूप जवळ केलं. मातोश्रीचे अन्न देखील तुम्हाला रश्मी वहिनींनी खायला घातलं. मात्र तुम्ही त्या अन्नाची किंमत ठेवली नाही. तसेच 50 कोटीच्या बॅगा भरायच्या आणि महाराष्ट्रात यायचं. तुम्ही विका आणि खानदान विका, मात्र आईलाही विकायला निघालात, असा घणाघातही विनायक राऊतांनी यावेळी केला.

दरम्यान, 40 गेले मात्र चाळीसच्या जागी आता भगव्याच्या 100 शिलेदारांना निवडून आणू, असा इशारा विनायक राऊतांनी यावेळी बंडखोर आमदारांना दिला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

बाळासाहेबांचा सन्मान म्हणत, नोटीस न बजावणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंचं जोरदार उत्तर, म्हणाले…

उद्धव ठाकरेंची लवकरच भेट घेणार; महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

“एकनाथ खडसेंची अवस्था म्हणजे, मंदिरात गेले तर प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला”