Home महाराष्ट्र आषाढी एकादशीला माणसातल्या “विठ्ठला”चे दर्शन झाले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केली भावना व्यक्त

आषाढी एकादशीला माणसातल्या “विठ्ठला”चे दर्शन झाले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केली भावना व्यक्त

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : औरंगाबादचा एक कार्यकर्ता काही कामानिमित्त बारामतीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटण्यासाठी गेला होता. परत येताना शरद पवारांनी त्या कार्यकर्त्याला चक्क विमानातून औरंगाबादला सोबत आणले.

डॉ. भारत चव्हाण असं त्या कार्यकर्त्याचं नाव असून, ते सरपंच आहेत आणि अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीसाठी काम करतात. त्यांनी शरद पवारांसोबत विमान प्रवासाचा अनुभव फेसबुकवर शेअर केला आहे.

राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला शरद पवार साहेब जेव्हा विमानातून स्वत:सोबत औरंगाबादला घेऊन जातात. हल्ली राजकारणात आपण पाहतो की राजकीय नेते जेव्हा सर्वसामान्य लोकांना ऐकून घ्यायला व भेटायलाही कंटाळा करतात. त्यांच्या समस्या तर बाजूलाच राहिल्या; पण भेटण्याच्याही सीमा ठरवतात तेव्हा एका सर्वसामान्य घरातून येणारा माझ्यासारखा तरुण म्हणून जेव्हा माझ्या काही अडचणी व प्रश्न खासदार शरद पवार साहेबांना भेटून त्यांच्या कानावर घालावं म्हणून पवारसाहेबांना भेटण्यासाठी मी काल रात्री औरंगाबादवरून बारामती गाठली.

हे ही वाचा : 40 गेले मात्र आता भगव्याच्या 100 शिलेदारांना निवडून आणू; शिवसेनेचा बंडखोरांना इशारा

गोविंदबाग येथे साहेबांना भेटण्यासाठी उपस्थित राहिलो. रात्रभर प्रवास करून थकलेला चेहरा पाहून साहेबांनी विचारलं, कुठून आलात ? मी औरंगाबादहून, असं उत्तर दिलं. मग साहेबांनी अडचणी काय आहेत वगैरे विचारल्या. समजून घेतल्या. मला खरंच खूप नवल वाटत होतं. माझं पूर्ण बोलणं झाल्यावर साहेब स्मितहास्य करीत म्हणाले, ठीक आहे. बघतो मी, काळजी करू नका. मी धन्यवाद साहेब म्हणत बाहेर पडणार तोच साहेबांनी पुन्हा आवाज दिला अन विचारले, औरंगाबादवरून आला आहात ना, परत कधी जाणार आहात? मी म्हटलं, साहेब आता निघेल. साहेब बोलले. थांबा, मी पण आज औरंगाबादलाच जातो आहे. तुम्हाला हरकत नसेल तर चला माझ्यासोबत. हे शब्द ऐकून मी स्वप्नात तर नाही ना, असे मला राहून राहून वाटत होते. तितक्यात साहेबांनीच पुन्हा मला सांगितलं, सोबतच जाऊयात.

दरम्यान, आषाढी एकादशीला मला माणसातल्या “विठ्ठला”चे दर्शन झाल्याची भावना मनात आयुष्यभर निरंतर राहील, अशी भावना भारत चव्हाण यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“उद्धव ठाकरेंनी बोलावलं, तर आम्ही मातोश्रीवर परत जाऊ; ‘या’ आमदाराचं मोठं वक्तव्य”

बाळासाहेबांचा सन्मान म्हणत, नोटीस न बजावणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंचं जोरदार उत्तर, म्हणाले…

उद्धव ठाकरेंची लवकरच भेट घेणार; महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य