आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत बोलताना, मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. तसेच राज ठाकरे या दाैऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत. यावरून आता भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया देत राज यांच्या अयोध्या दाैऱ्यास विरोध केला आहे.
उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी., अशी मागणी ब्रीजभूषण यांनी यावेळी केली. तसेच राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत योगी आदित्यनाथ यांनी त्यांना भेटू नये, असंही ब्रीजभूषण यांनी यावेळी म्हटलं.
हे ही वाचा : “तुम्ही मशिदींवरील भोंग्यांचं राजकारण सुरू केलं, आणि आता ते हिंदुंच्या गळ्यापर्यंत आलं”
राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका सारखीच आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही., असं ब्रीजभूषण म्हणाले.
राम मंदिर आन्दोलन से लेकर मंदिर निर्माण तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दू परिषद और आमजन की ही भूमिका रही है
ठाकरे परिवार का इससे कोई लेना देना नहीं#Thackerayfamily #ShivSena #RamMandirAyodhya #JaiShreeRam #RamMandir @ShriRamTeerth @narendramodi @RSSorg @VHPDigital— BrijBhushan Sharan Singh MP (@sharan_mp) May 5, 2022
महत्वाच्या घडामोडी –
हनुमान चालिसावर वकील गुणरत्न सदावर्तेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
भोंग्याच्या निर्णयावरून शिवसैनिकांचा राज ठाकरेंना पाठिंबा, म्हणाले…
“मोठी बातमी! अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केलं दाखल”