“मुख्यमंत्री केस कुठं कापतात, दाढी कुठं करतात हा प्रश्नच?;” भाजप आमदाराचा टोला

0
186

गुहागर : राज्य सरकारने आता अनेक व्यवसायांना सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी सलून व्यवसाय सुरू करण्यास अजूनही परवानगी दिलेली नाही. याच मुद्द्यावरुन भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी खोचक शब्दात टीका केली आहे.

माननीय मुख्यमंत्री रोज अगदी टापटीप दिसतात, ते केस कुठं कापतात, दाढी कुठं करतात हा प्रश्नच आहे, असं प्रसाद लाड यांनी वक्तव्य केलं. चक्रीवादळामुळे कोकण दौऱ्यावर असणाऱ्या लाड यांनी गुहागरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं.

दरम्यान, कोकणामध्ये नाभिक समाजाने हत्यारबंद आंदोलनाची हाक दिली आहे. याचसंदर्भात लाड यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी खोचक शब्दात उत्तर दिलं. आमच्या दाढ्या वाढल्यात, मात्र मुख्यमंत्री रोजच टापटीप दिसतात, ते केस कुठं कापतात? हा प्रश्न आम्हाला पडलाय, असं म्हणत प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं.

महत्वाच्या घडामोडी-

कोल्हापुरात शिवसेना, व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी

आम्हाला फक्त विदुषक हवाय; शरद पवारांचा राजनाथ सिंग यांना टोला

“कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवावी लागेल; डॉ.अमोल कोल्हेंचा खास कानमंत्र”

भाजप नेते कोकण दौऱ्यावर गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवारांना घराबाहेर पडावं वाटलं- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here