Home महाराष्ट्र कोल्हापुरात शिवसेना, व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी

कोल्हापुरात शिवसेना, व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी

कोल्हापूर : चीनी मालावर बहिष्कार टाकावा, असं आवाहन करत मंगळवारी कोल्हापुरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना आणि कोल्हापूर जिल्हा व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी करण्यात आली.

जगाला करोना विषाणूमुळे त्रस्त करणाऱ्या आणि जगात चीनी हुकुमशाही गाजवू पाहणाऱ्या चीनच्या विरोधात खदखद निर्माण झाली आहे. ही खदखद सर्वसामान्यांनी दाखवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, असल्याची माहिती मिळाली आहे.

करोनामुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. करोना ही चीनची उत्पत्ती आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यातच चीन सीमेवर भारतावर कुरघोडी करू पहातोय, त्यामुळे चीनची मस्ती जिरवण्यासाठी देशवासीयांनी चीनी वस्तूवर बहिष्कार टाकून, स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असं आवाहन माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं.

दरम्यान, भारत माता की जय, चीन सरकार हाय हाय, चीनी वस्तूंचा वापर बंद करा, स्वदेशी वापरा, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

महत्वाच्या घडामोडी-

आम्हाला फक्त विदुषक हवाय; शरद पवारांचा राजनाथ सिंग यांना टोला

“कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवावी लागेल; डॉ.अमोल कोल्हेंचा खास कानमंत्र”

भाजप नेते कोकण दौऱ्यावर गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवारांना घराबाहेर पडावं वाटलं- चंद्रकांत पाटील

“कोरोनाची लढाई कशी लढावी ते महाराष्ट्रानं कर्नाटक आणि उत्तर प्रदेशाकडून शिकावं”