Home महाराष्ट्र “कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवावी लागेल; डॉ.अमोल कोल्हेंचा खास कानमंत्र”

“कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवावी लागेल; डॉ.अमोल कोल्हेंचा खास कानमंत्र”

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सध्या नागरिकांच्या मनात कोरोनावर कधी लस येणार? असे प्रश्न हैदौस घालत आहेत. यावर शिरूरचे खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवावी लागेल, असं मत मांडत एक लेख लिहिला आहे.

देशातील एकूण परिस्थितीचा विचार केल्यास कोरोनाची आपल्याबरोबर राहण्याची तयारी असो वा नसो, आपल्याला उपचार किंवा लस मिळेपर्यंत आणि ती सर्वांना उपलब्ध होईपर्यंत कोरोनाबरोबर राहावं लागेल. हे शक्‍य आहे, परंतु ती एक जबाबदारी आहे, हे लक्षात घ्यावे, असं डॉ.अमोल कोल्हे म्हणाले.

दरम्यान, जागतिक अहवालांनुसार लॉकडाउनमुळं कोरोनाचा गुणाकार रोखण्यात यश आलं असलं, तरी 24 मार्चला लॉकडाउन सुरू होताना देशात कोरोनाचे केवळ 536 रुग्ण होते, आज ही संख्या सव्वा दोन लाखांच्या पुढं गेली आहे. परिस्थिती अजूनही नियंत्रणात येण्याची चिन्हं नाहीत. इतकंच नाही, तर काही घटकांमध्ये लॉकडाउनबाबत ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी भावना निर्माण झाली आहे, असेही डॉ.अमोल कोल्हे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

भाजप नेते कोकण दौऱ्यावर गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवारांना घराबाहेर पडावं वाटलं- चंद्रकांत पाटील

“कोरोनाची लढाई कशी लढावी ते महाराष्ट्रानं कर्नाटक आणि उत्तर प्रदेशाकडून शिकावं”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय?; मुख्यमंत्र्यांनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक

शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाला धोका दिला- राजनाथ सिंग