Home महाराष्ट्र भोंग्याच्या निर्णयावरून शिवसैनिकांचा राज ठाकरेंना पाठिंबा, म्हणाले…

भोंग्याच्या निर्णयावरून शिवसैनिकांचा राज ठाकरेंना पाठिंबा, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंनी हिंदूंना मशिदीबाहेर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा चालवण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर काल त्यांनी पुन्हा आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं.

मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात एक दिवसाचे आंदोलन नव्हते. हे भोंगे उतरविले जात नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असं राज ठाकरेंनी काल स्पष्ट केलं. राज ठाकरेंच्या या निर्णयानंतर अनेक शिवसैनिकांचा राज ठाकरेंना पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे. इकाॅनाॅमिक टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केलं दाखल”

अनेक जुने शिवसैनिक राज ठाकरेंशी सहमत आहेत. राज ठाकरेंनी मशिदींमधून लाऊडस्पीकर खाली उतरवणे आणि रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून रोखण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. आपण यासाठी असहमत कसे होऊ शकता? बाळासाहेब नेहमी याच मुद्यावर राहिले. राज यांच्याऐवजी आपणच हा मुद्दा उपस्थित करायला हवा होता, असं मुंबईतील माजी शाखाप्रमुख म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांनी…; देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका

“ज्या दिवशी माझं सरकार येईल त्यावेळी मी…; राज ठाकरेंनी शेअर केला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ”

 …आणि मविआ सरकार राज ठाकरेंना तुरूंगात डांबेल- चंद्रकांत पाटील