Home महाराष्ट्र मनसे ही बिनबुडाची झालीये, तिला बुडही नाही आणि शेंबूडही; शिवसेनेचा जोरदार पलटवार

मनसे ही बिनबुडाची झालीये, तिला बुडही नाही आणि शेंबूडही; शिवसेनेचा जोरदार पलटवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी परवा दिवशी गुढीपाडव्याला बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. यावरून आता शिवसेना खासदार अरविदं सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीवर टीका करणारी मनसे ही बिनबुडाची झाली आहे. तिला बुडही नाही आणि शेंडाही नाहीये. मनसेचा झेंडा बदलला तसा त्यांचा विचारही बदलला आहे. लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे आता भाजपचे कॉन्ट्रॅक्टर झाले आहेत, असा जोरदार घणाघात अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंवर केला.

हे ही वाचा : “…तोपर्यंत भाजप -मनसेची युती शक्य नाही”; रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला बोलताना शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेनेनंच भाजपशी असलेली युती तोडल्याचा दावा रािज यांनी केला होता. केवळ सत्तेसाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली होती. तुमच्यात जर काही फॉर्म्युला ठरला होता तर तो तुम्ही जाहीरपणे का सांगितला नाही? बंद दाराआड चर्चा करण्याची गरज काय होती? असा सवालही राज यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता.

महत्वाच्या घडामोडी –

चौकशीवेळी पोलीसांवर दबाव असल्याचं स्पष्टपणे जाणवलं; प्रवीण दरेकर यांचा दावा

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिंनीनो आणि मातांनो…; ‘शिवतीर्थ’वर राज गर्जना बरसली”

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; काँग्रेस आमदाराच्या समोरच माजी नगरसेवकानं हाती बांधलं घड्याळ”