Home पुणे “….म्हणून राज ठाकरे पत्रकारांवर भडकले”

“….म्हणून राज ठाकरे पत्रकारांवर भडकले”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरे पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील अक्षयधारा या पुस्तकांच्या दुकानात जात होते. यावेळी माध्यम प्रतिनिंधींनी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी राज ठाकरेंना घेरलं.

हे ही वाचा : रोहित पवार तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही महाराष्ट्राला सल्ले देऊ नकात- गोपीचंद पडळकर

राज ठाकरे यांनी गाडीतून उतरल्यावर हे चित्र पाहताच संताप व्यक्त केला. राज ठाकरेंनी त्यांच्या हाताच्या बोटांनी इशारा करत कॅमेरा बंद करा असं म्हणत संताप व्यक्त केला.

गाडीतून खाली उतरताच समोर उभ्या असलेल्या कॅमेरामन आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवर त्यांनी राग व्यक्त केला. ‘बंद करा त्या लाईट… माणसाला काय जगू द्या की नाही…?” असा सवाल करत कॅमेरा बंद करण्याचा त्यांनी हाताने इशारा केला.

दरम्यान, राज ठाकरेंचा रुद्रावतार पाहून माध्यम प्रतिनिधींनी देखील झटपट लाईट बंद करत कॅमेरेही बंद केले. त्यानंतर राज ठाकरे मीडियाशी न बोलता, कुठलीही प्रतिक्रिया न देता तावातावाने निघून गेले.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदारांच्या कारचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!

मनसेची ताकद वाढली; नागपूरमधील अनेक महिलांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा