Home महाराष्ट्र यंदा बाकीच्या पक्षांना हाणायचं म्हणजे, हाणायचं; ‘राज’गर्जना बरसली

यंदा बाकीच्या पक्षांना हाणायचं म्हणजे, हाणायचं; ‘राज’गर्जना बरसली

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून पक्षाने मोर्चेबांधणीला देखील जोरदार तयारी केली आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीवरून मोठं वक्तव्य केलं आहे.

यंदा निर्धार करायचा, यंदा निर्धार करा, इतर राजकीय पक्षांना हाणायंच म्हणजे हाणायचं असं वक्तव्य राज ठाकरेंनी केल्यावर कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला. राज ठाकरे यांनी मुंबईतील कांदिवली भागात मनसेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : मनसेत सुसाट इनकमिंग, गोरेगाव येथील अनेक तरूण-तरूणींना हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

दरम्यान, राज्यातल्या अनेक महापालिकांच्या मुदती संपत आल्याने महापालिकेवर प्रशासकही नेमण्यात आले आहेत. निवडणुकासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. नवी प्रभागरचनाही सर्व महानगरपालिकांची सादर झाली आहे. अशावेळी राज ठाकरेंचं हे वक्तव्य नेमकं कोणते संकेत देत आहे, हे कळायला मार्ग नाही.

महत्वाच्या घडामोडी –

पटापट पेट्रोल टँक भरून घ्या, कारण मोदी सरकारची इलेक्शन ऑफर संपणार; राहुल गांधींचा टोला

“लढायचं ते जिंकण्यासाठी; पुण्यात मनसेचा नवा नारा, पोस्टरवर पहिल्यांदाच अमित ठाकरे”

आगामी काळात भाजपमधील 17 नगरसेवक राष्ट्रवादीत येणार; ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट