Home महाराष्ट्र शरद पवारांच्या सिलव्हर ओकवरील आंदोलनावर उदयनराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवारांच्या सिलव्हर ओकवरील आंदोलनावर उदयनराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूूर : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. यावरून आता भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

हे ही वाचा : पवारांच्या घरावरील हल्ला निंदनीय, दोषींवर कडक कारवाई करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

या जन्मी आपण जे कर्म करतो, ते याच जन्मी फेडावं लागतं. सगळ्यांना हे लागू होतं. अपवाद कुणाचाही नाही. अजून काय बोलणार त्यावर?” असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

हे पंचायत राजची संकल्पना सांगतात. जी गांधीजींनी तेव्हा मांडली होती. जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही, तोपर्यंत लोकशाही देशात नांदणार नाही. काय केलं काँग्रेस-राष्ट्रवादीनं? सत्तेचं केंद्रीकरण केलं. मूठभर लोकांच्या हातात सत्ता राहिली आणि बाकीच्यांना त्यांनी सोयीप्रमाणे वापरलं. याला गुलामगिरी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?” असंही उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

सिलव्हर ओकवरील आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

“आज सुप्रिया सुळेंमध्ये इंदिरा गांधी दिसल्या”

“INS विक्रांत घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांना पोलिसांकडून समन्स, उद्या चाैकशीसाठी हजर राहणार”