Home महाराष्ट्र “मोठी बातमी! अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी”

“मोठी बातमी! अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या.

या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली होती. या प्रकरणी आज किला सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान पोलिसांनी सखोल चौकशीसाठी सदावर्ते यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा : नितीन गडकरींनंतर आता रावसाहेब दानवे राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांना पुन्हा उधाण

दरम्यान, न्यायाधीश कैलास सावंत यांनी निकाल दिला असून, गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाने 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून 109 एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांच्या घरावर झालेल्या आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांना सुनावलं ; म्हणाले…

शरद पवारांच्या सिलव्हर ओकवरील आंदोलनावर उदयनराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

संपादक पदावरचा माणूस ज्या शिव्या घालतो, त्या…; नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका