आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.
हे ही वाचा : “कोकणात शिवसेना आणखी मजबूत होणार, आदित्य ठाकरे 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कोकण दाैऱ्यावर”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मुंबईतल्या भांडुप विधानसभेतील शेकडो महिला- पुरुष नागरिकांनी पक्षाचे नेते श्री. अमितजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘राजगड’ मुख्यालयात पक्षप्रवेश केला. याप्रसंगी पक्षाचे उपाध्यक्ष श्री. योगेश सावंत, महिला सेनेच्या उपाध्यक्षा सौ. अनिषा माजगावकर, विभागअध्यक्ष श्री. संदीप जळगावकर उपस्थित होते.
याप्रसंगी पक्षाचे उपाध्यक्ष श्री. योगेश सावंत, महिला सेनेच्या उपाध्यक्षा सौ. अनिषा माजगावकर, विभागअध्यक्ष श्री. संदीप जळगावकर उपस्थित होते. मनसे कुटुंबात सर्वांचे मनःपूर्वक स्वागत.#मनसे_मनामनांत #मनसे_घराघरांत #MNSAdhikrut
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 3, 2022
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र व मनसे नेते अमित ठाकरे हे स्वत: मैदानात उतरले असून नुकतीच मुंबईतील एमआयजी क्लब येथे राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, मनसेत प्रवेश करत आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
“गोव्यात शिवसेना सुसाट, ‘या’ प्रसिद्ध फुटबाॅलपटूनं आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”
बंड्या तात्यांनी महिलांची तात्काळ माफी मागावी, अन्यथा खळखट्याक अटळ; रूपाली पाटलांचा इशारा