आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे औरंगाबाद शहरात आगमन झालं. शहरातील क्रांती चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा स्थापन करण्यात येत असून त्याचं काम सुरु आहे. तसेच या पुतळ्याचे येत्या 10 फेब्रुवारी रोजी रितसर उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हातानेच केले जावे, असा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. तसेच एमआयएमनेदेखील हीच भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे महापालिका या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करत आहे. याच मुद्द्यावरुन आता उद्घाटनाचा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
हे ही वाचा : सत्तेसाठी भाजपाची मदत घेणाऱ्या शिवसेनेने आम्हाला निष्ठा शिकवू नये; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
दरम्यान, पुतळ्याच्या उद्घाटनावरुन एमआयएम, मराठा क्रांती मोर्चाने आपल्या भूमिका घेतल्या आहेत. तर पालिका आपली वेगळी भूमिका घेऊन कामाला लागलेली आहे. याच कारणामुळे शिवाजी महाराज पुतळा उद्घाटनाचा वाद पेटण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीच्या आमदाराकडून तालुका अध्यक्षांना चारचाकीचं वाटप; अजितदादांच्या हस्ते केलं वाटप
माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा; सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज
“भाजपची मोठी खेळी; काँग्रेसनं निलंबित केलेल्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”