Home महाराष्ट्र लता मंगेशकरांच्या स्मारकावरुन वाद रंगला; आता मनसेचीही प्रतिक्रिया, म्हणाले…

लता मंगेशकरांच्या स्मारकावरुन वाद रंगला; आता मनसेचीही प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालं आहे. शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात याच ठिकाणी त्यांचे स्मारक करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावरुन चांगलाच वाद रंगला असून यात आता मनसेनेही उडी घेतली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासियांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती”. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलं आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध; पोलिसांनी घेतलं शिवसैनिकांना ताब्यात

भाजपा व काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला असताना भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठीच असावे, अशी भूमिका मांडली. तर स्मारकावरून राजकारण करू नका, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला. यानंतर आता मनसेकडूनही प्रतिक्रिया आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘नमस्ते ट्रम्प’ मुळं देशात कोरोना पसरला, याला जबाबदार फक्त पंतप्रधान मोदीच- नवाब मलिक

“त्रिपुरात भाजपला मोठे धक्के, ‘या’ 2 मोठ्या नेत्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

“खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण”