आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आता पावलं उचलण्यात येत आहेत. त्याच संदर्भात आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तूर्तास तरी लाॅकडाऊन लावण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बुस्टर डोसविषयी महत्त्वाची बातमी दिली. लसीकरण झालेले असूनही नागरिकांना कोरोनाची आणि ओमिक्राॅनची लागण होत असल्याचं चित्र आहेे. त्यामुळे आता खासगी रुग्णालयात बुस्टर डोस देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.
हे ही वाचा : “मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद”
दरम्यान, आता बैठकीत झालेल्या चर्चा आणि निर्णयाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर आज रात्री नवे निर्बंध लावण्याच्या संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना येतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मनसेत सुसाट पक्षप्रवेश; पालघरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
“शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी घेतली भाजप नेते रावसाहेब दानवेंची भेट, चर्चांना उधाण”
…मग औरंगाबादकरांवर अन्याय का?; गुंठेवारी प्रश्नावरून मनसे कार्यकर्त्यांचं आक्रमक आंदोलन