Home तंत्रज्ञान व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये आता दिसणार…; जाणून घ्या नव्या फिचरबद्दल

व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये आता दिसणार…; जाणून घ्या नव्या फिचरबद्दल

480

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी नवीन फिचर्स अणलं आहे. यामध्ये आतापर्यंत नोटिफिकेशनमध्ये मॅसेज पाठवण्याऱ्याचा प्रोफाईल फोटो दिसत नव्हता. ही सुविधा आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही सिस्टमवर नव्हती. मात्र आता नोटिफिकेशन पाठवण्याऱ्याचा मॅसेजसह प्रोफाईल फोटो दिसणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने या वर्षी 2022 मध्ये पहिला बदल केला आहे. हा फिचर सुरुवातीला फक्त आयओएस बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे.

आयओएस १५ चे युजर्स व्हॉट्सअ‍ॅप 2.22.1.1 बीटा वर्जन वापरत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप फिचर ट्रॅकर WABeta Info ने या संबंधित स्क्रीनशॉट आपल्या ब्लॉगवर शेअर केला आहे. यात लिहिलं आहे की, व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशन पाठवण्याऱ्याचा मॅसेजसह प्रोफाइल फोटोही दिसेल. याचा अर्थ आता चॅट आणि ग्रुप चॅटमध्ये मॅसेज आल्यास पाठवण्याऱ्याचा प्रोफाईल फोटोही दिसेल.

हे ही वाचा : मुंबईत लॉकडाऊन लावण्याची गरज नाही, घाबरु नका, काळजी घ्या; महापौर किशोरी पेडणेकर यांचं जनतेला आवाहन

WABetaInfo ने पुढे म्हटले आहे की. ज्या युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप खात्यावर अद्याप हे फीचर उपलब्ध नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. सध्या, व्हॉट्सअ‍ॅप अधिक खात्यांमध्ये हे फिचर सक्रिय करण्याचा विचार करत आहे.

दरम्यान, WABetaInfo ने सांगितले की, “सध्या काही लोकांना त्यांच्या WhatsApp खात्यावरील विशिष्ट नोटिफिकेशनमध्ये प्रोफाइल फोटो दिसत नाही. हे एक बीटा फिचर असल्याने, आम्ही लवकरच या सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”

महत्वाच्या घडामोडी – 

“आशिष शेलार यांच्यानंतर आता काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला जीवे मारण्याची धमकी”

किरीट सोमय्यांनी केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“महाराष्ट्रात आजपासून रात्रीची संचारबंदी, राज्य सरकारची नवी नियमावली, वाचा काय सुरू, काय बंद”