Home महाराष्ट्र “आशिष शेलार यांच्यानंतर आता काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला जीवे मारण्याची धमकी”

“आशिष शेलार यांच्यानंतर आता काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला जीवे मारण्याची धमकी”

594

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

2 दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी आशिष शेलार यांनी पत्र लिहून पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर आता काँग्रेस नेत्यालाही धमकी मिळाली आहे.

हे ही वाचा : किरीट सोमय्यांनी केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रकांत हंडोरे यांनी याबाबत टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे निलेश नानचे असं हंडोरे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव असून पोलिस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

“महाराष्ट्रात आजपासून रात्रीची संचारबंदी, राज्य सरकारची नवी नियमावली, वाचा काय सुरू, काय बंद”

‘मुंबई महापालिकेत 500 कोटींचा भ्रष्टाचार’, भाजपच्या ‘या’ आमदाराचा आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

कोरोनाचा विषाणू नष्ट करण्यासाठी पुणेकरांने बनवलं अजब यंत्र