Home महाराष्ट्र “बावनकुळेंच्या विजयाने महाविकासआघाडीला चपराक बसली”

“बावनकुळेंच्या विजयाने महाविकासआघाडीला चपराक बसली”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नागपूर विधानपरिषद जागेसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला असून काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. यावरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आज मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेंना मोठा विजय मिळाला आहे. खरंतर मी स्वत: निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद आज बावनकुळेंच्या विजयाचा झाला आहे. या विजयाने महाविकासआघाडीला चपराक दिली आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला.

हे ही वाचा : “शिवसेनेचा भाजपला दे धक्का; कट्टर राणे समर्थकानं हाती बांधलं शिवबंधन”

अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. विधानपरिषदेच्या सहा पैकी चर जागी भाजपा निवडून आली आहे. महाविकासआघाडीत तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळ्या प्रकारचे विजय होऊ शकतात, असं मांडलं जात असलेलं गणित चुकीचं आहे हेही या विजयानं स्पष्ट केलं आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यातली जनता भाजपाच्या पाठिशी आहे आणि भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल. बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे”, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपचा शिवसेनेला धक्का; अकोला विधान परिषद निवडणुकीत भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी

नागपूर विधान परिषद निवडणूक; काँग्रेसला धक्का, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी

नाना पटोले कुणाच्याही दबावात येत नाही, त्यांच्या बापाशी लढून मी…; नाना पटोले भाजपवर कडाडले