Home महाराष्ट्र “….म्हणून मतदानाच्या आधीच काँग्रेसने बदलला उमेदवार”

“….म्हणून मतदानाच्या आधीच काँग्रेसने बदलला उमेदवार”

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्वराज्य संस्था मतदारसंघात मतदानाच्या 15 तास आधी काँग्रेसने आपला उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. यामुळे काँग्रेसमधील अनागोंदी पुन्हा उघड झाली आहे. रवींद्र भोयर यांच्याऐवजी काँग्रेसने मंगेश देशमुख यांना पाठिंबा घोषित केला.

काँग्रेसने देशमुख यांना पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर निवडणूक लढण्यासाठी भाजपात बंडखोरी करून काँग्रेसमध्ये गेलेले रवींद्र भोयर म्हणालेत की, पक्ष असा काही निर्णय घेईल याची मला कल्पना नव्हती; संध्याकाळपर्यंत  मी प्रचारात होतो. ‘पक्षाचा निर्णय मंजूर आहे’

हे ही वाचा : “दुनिया मे *** की कमी नही, जरा योगीजी को सुनिये; संजय राऊतांनी व्हिडिओ केला ट्विट

निवडणूक लढण्यासाठी भाजपातून आलेले भोयर यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी होती. काँग्रेसमध्ये भोयर यांचा आयात उमेदवार म्हणून उल्लेख होत होता. त्यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीचे कोणीही नेते त्यांचा मदतीला दिसले नाहीत. निवडणुकीच्या तयारीच्या आघाडीवर काँग्रेसची काही हालचाल जाणवत नव्हती.

दरम्यान,  राजकीय वर्तुळात, काँग्रेसने निवडणूक सोडली, अशी काँग्रेसची नाचक्की करणारी चर्चा सुरू झाल्यानंतर तीन दिवस आधी काँग्रेसचे नेते व पालकमंत्री नितीन राऊत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेऊन काँग्रेसच्या प्रचाराला गती देण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत मंगेश देशमुख हेदेखील हजर होते.

महत्वाच्या घडामोडी –

आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवा; ‘या’ काँग्रेस नेत्याचं कार्यकर्त्यांना आवाहन

“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ओबीसी आरक्षणासाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल”

रामदास आठवलेंनी सांगितला रिपाई-भाजप युतीचा फाॅर्म्युला, म्हणाले…