आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर बरं झाले असतं, पण आता आम्ही त्यांना सोबत घेणार नाही, आणि त्यांना काही देणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा मुंबईतल्या आझाद मैदानात संप सुरु आहे. रामदास आठवले यांनी संपाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात येऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेने भाजपाशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र हे सरकार कधीही जाईल अशी चर्चा आहे, उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर बरं झाले असते , पण आता आम्ही त्यांना सोबत घेणार नाही, आणि त्यांना काही देणार नाही, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेललाच सर्वाधिक मते मिळणार- शिवेंद्रराजे भोसले
एसटी नसती तर मी पुढारी नसतो असंही आठवले यांनी म्हटलं आहे. जय भीम आहे माझ्या गाठीशी, मी तुमच्या आहे पाठिशी, सरकारला सळो की पळो करुन सोडा असं आवाहनही रामदास आठवले यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना केलं आहे.
दरम्यान, आठवले यांनी कवितेतून ठाकरे सरकारवर टीका केली. एसटीचं झालं नाही विलीनीकरण, तर ठाकरे सरकारचं होणार मरण, कर्मचारी येणार नाहीत शरण, कारण सरकारचं होणार आहे मरण, अशा शब्दात आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
महत्वाच्या घडामोडी –
विक्रम गोखले म्हणाले, कंगना योग्यच बोलली, आता शरद पवार म्हणतात…