आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या संपाबद्दल सरकारने कारवाई करणे सुरू केलं आहे. राज्यभरातील 16 विभागांतील 45 आगारांमधील 376 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. तसेच न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. त्यानंतरही संघटनांनी संप सुरू ठेवल्याबद्दल एसटी महामंडळ अवमान याचिका दाखल करणार आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : गरिबांना लुटायचं आणि उद्योगमंत्र्यांनी खिसे भरायचे हा मोदींचा एककलमी कार्यक्रम- नाना पटोले
भूमिपूत्रांना नोकरी देण्याच्या बाता मारणा-या शिवसेनेनं नोकरी तर दिलीच नाही उलट मराठी ST कर्मचाऱ्यांची नोकरी घालवण्याचं पाप केलंय…शिवसेनेनं भूमिपूत्रांवर अन्याय केलाय…मराठी जनतेसाठी आजचा काळा दिवस आहे.. महाविकास आघाडीचं सरकार मराठी द्रोही.. महाराष्ट्र द्रोहींचं आगार !, असा घणाघात चित्रा वाघ यांनी आघाडी सरकारवर केला.
भूमिपूत्रांना नोकरी देण्याच्या बाता मारणा-या शिवसेनेनं नोकरी तर दिलीच नाही उलट मराठी ST कर्मचाऱ्यांची नोकरी घालवण्याचं पाप केलंय…
शिवसेनेनं भूमिपूत्रांवर अन्याय केलाय…मराठी जनतेसाठी आजचा काळा दिवस आहे..
महाविकास आघाडीचं सरकार
मराठी द्रोही.. महाराष्ट्र द्रोहींचं आगार !— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 10, 2021
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याने वाढवलं भाजपचं टेन्शन; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी यशस्वी खेळी
शिवेंद्रराजेंची भेट झाली नाही तरी त्यांना गाठणारच; उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा
मनसेत प्रवेशाचा धडाका; नवी मुंबईमध्ये अनेक तरुणांचा मनसेत जाहीर पक्षप्रवेश