एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल ते बरळतायत; गिरीश महाजनांचा पलटवार

0
346

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं राजकीय वैर सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. अशातच एकनाथ खडसे यांना ठाण्याला दाखवायला हवं, असं म्हणत गिरीश महाजन यांनी निशाणा साधला होता. त्याला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मला ठाण्याला वेड्याच्या रुग्णालयात दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे, असा टोला एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे.  यावरून आता गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे.

हे ही वाचा : आमची चूक झाली, आम्ही आता वकील बदलत आहोत; पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचारी आक्रमक

एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळताय, असं जोरदार पलटवार गिरीश महाजन यांनी यावेळी केला. तसेच खोटेनाटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचे उद्योग ते करतायत, असा आरोपही गिरीश महाजन यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

‘…अन् राष्ट्रवादीकडं गेलो की वर्षात ईडी लावता’; एकनाथ खडसेंचा भाजपाला सवाल

तुफान बर्फवृष्टी अन् हाडं गोठवणार्या थंडीत भारतीय जवानांच नृत्य; व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

शिवसेना आमदाराचं एसटी कर्मचाऱ्यांबाबतचं ‘ते’ पत्र व्हायरल, नंतर आमदार म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here