“ युवा मंत्री पब-पार्टीत गुंग आणि कार्यकर्ते ‘गोली मार भेजे मे’ स्टाईलमध्ये रस्त्यावर नाचत आहेत”

0
397

मुंबई : शिवसेनेचा लोगो असलेल्या वाहनातून प्रवास करत असलेले 2 जण बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केला आहे. यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

ज्या पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो बघितल्यावर स्पष्ट होतं की, यावेळी राज्याच्या सत्तेत बसलेले युवा मंत्री पब-पार्टी आणि फिल्मी दुनिया याच्यातच वावरत आहे. कार्यकर्ते ‘गोली मार भेजे मे’ अशापद्धतीने फिल्मी स्टाईलमध्ये रस्त्यावर नाचत आहेत, असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सरकारने महाराष्ट्राच्या संस्कृतीला अभिप्रेत असलेलं वर्तन करावं, असंही आशिष शेलार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

राष्ट्रवादीला मोठा सुरूंग; 4 आमदारांचा शिवसेनेत प्रवेश

बेळगावला केंद्रशासित राज्य करा; शिवसेनेची पंतप्रधानांकडे मागणी

आता आम्ही त्यांच्यापुढे डोकं फोडून घ्यावं का?; अजित पवार संतापले

“2 टक्क्याच्या कंगणाला झाशीची राणी म्हणणारे भाजपचे चमचे आणि फडणवीस आता गप्प का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here