Home विदेश “जगप्रसिद्ध गोल्फर टायगर वूड्सचा भीषण अपघात”

“जगप्रसिद्ध गोल्फर टायगर वूड्सचा भीषण अपघात”

277

लॉस एंजिल्स : जगप्रसिद्ध गोल्फ खेळाडू टायगर वूड्सचा भीषण अपघात झाला. भरधाव कार अपघातात टायगर वूड्स गंभीर जखमी झाला.

लॉस एंजिल्सजवळ मंगळवारी ही दुर्घटना घडली. सध्या टायगर वूड्सला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. वूड्सच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. भीषण अपघातातून तो थोडक्यात बचावला.

मिळालेल्या माहितीनुसार, गोल्फर टायगर वूड्स स्वत: कार चालवत होता. वूड्स हा हॉथोर्न बुलेवार्डकडे वेगाने जात होता. त्यावेळी गाडीवर नियंत्रण सुटल्याने, कार थेट डिव्हायडरला धडकली. वूड्सला जेव्हा गाडीतून बाहेर काढलं, त्यावेळी तो रक्तबंबाळ झाला होता. त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या.

दरम्यान, टायगर वूड्सने 15 सर्वोत्तम गोल्फ चॅम्पियनशीप जिंकल्या आहेत. तब्बल 683 आठवडे तो नंबर वन रँकिंगवर काबीज होता.


महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत”

“जयंतरावांचं अचूक नियोजन, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच”

संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ- निलेश राणे

राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहे का?; प्रवीण दरेकरांचा सवाल