“कोकणात उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार?; ‘हा’ मोठा हाती बांधणार शिवबंधन”

0
294

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाकरेंची ताकद आणखी वाढणार आहे.

उद्धव ठाकरे हे उद्या कोकण दाैऱ्यावर येणार आहेत. उद्धव ठाकरे यांची उद्या रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये गुहागर मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्ते हे राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजयराव कदम हे देखील याच मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

हे ही वाचा : तुमच्यावर हल्ला कसा झाला?; संदीप देशपांडेंनी सांगितला सविस्तर घटनाक्रम, म्हणाले…

दरम्यान, या सभेला मुस्लिमांनी उपस्थित राहावे, असं आवाहन मराठी मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर यांनी केले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाचा पाठिंबा ठाकरेंना मिळणार का?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्र्यांचा काँग्रस, राष्ट्रवादीला मोठा धक्का; तब्बल 41 जणांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

“रूग्णवाहिका मध्येच बंद पडल्याने, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं निधन”

“मीच जनतेच्या मनातील आमदार म्हणणाऱ्या, बंडखोर उमेद्वार राहुल कलाटे यांचं डिपाॅझिट रद्द”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here