शिंदे सरकारमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार?; आमदार राजू पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

0
1903

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

डोंबिवली : भाजपच्या कोट्यातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची जोरदार चर्चा आहे. यावर आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही आत्तापर्यंत भाजपला पाठिंबा दिला, राष्ट्रपती निवडणूकीत देखील त्यांना पाठिंबा देत आहोत. हा पाठिंबा हिंदुत्वासाठी दिला आहे आणि याच करता आम्ही सरकार मध्ये आहोत. कोणत्याही अपेक्षेने किंवा मंत्रिपदाच्या अपेक्षेने आम्ही या सरकारला पाठिंबा दिला नाही, असं आमदार राजू पाटील यांनी यावेळी म्हटलं. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : …तर केसरकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत; निलेश राणेंचा घणाघात

दरम्यान, जर विधानरिषदेवर आमच्या पक्षातील नेते आमदार म्हणून जात असतील आणि आमदारकी मिळत असेल तर आनंदच आहे. दोन्ही हाऊस मध्ये आमचा आवज असेल आणि अशी गोष्ट घडली तर स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! दिपाली सय्यद यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात पंकजा मुंडेंचा समावेश होणार का?; पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

“शिवसेनेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका सूरूच; स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या असंख्य कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here