Home क्रीडा टीम इंडियाच्या दमदार ‘विराट’ विजयावर, पत्नी अनुष्का शर्माची भावूक प्रतिक्रिया, म्हणाली…

टीम इंडियाच्या दमदार ‘विराट’ विजयावर, पत्नी अनुष्का शर्माची भावूक प्रतिक्रिया, म्हणाली…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मेलबर्न : टी 20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज मेलबर्नमध्ये महामुकाबला झाला त्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली.

विराट कोहली या विजयाचा हिरो ठरला. त्याने हरलेली मॅच टीम इंडियाला जिंकून दिली. विराटने या मॅचमध्ये 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 4 षटकार होते. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. कोहलीच्या या परफाॅर्मन्सवर त्याची पत्नी अनुष्का शर्माने भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ही भावूक प्रतिक्रिया दिली आहे. ‘सुंदर, अत्यंत सुंदर! आज रात्री तू अनेकांच्या आयुष्यात आनंद आणलंस आणि तोही दिवाळीच्या पूर्वसंध्येला. तू खरंच एक अद्भुत व्यक्ती आहेस. तुझी जिद्द, तुझा विश्वास जबरदस्त आहे. मी हे नक्की म्हणू शकते की मी माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम सामना आज पाहिला,’ अशा शब्दांत अनुष्काने आनंद व्यक्त केला.

हे ही वाचा : हरलेली मॅच पाकिस्तानच्या खिशातून विराटने खेचून आणली; वेलडन विराट

‘आपली मुलगी हे समजण्यासाठी आता खूप लहान आहे की, तिची आई आनंदाने का नाचत होती? पण एके दिवशी तिला हे समजेल की तिच्या वडिलांनी त्या रात्री आपली सर्वोत्तम खेळी खेळली होती. त्याच्यासाठी हा टप्पा खूप कठीण होता, पण तो त्यातून आधीपेक्षा अधिक मजूबत आणि यशस्वीपणे बाहेर आला. मला तुझा खूप अभिमान आहे. तुझ्यावर माझं कायम प्रेम असेल, प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक परिस्थितीत माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. मी कृतज्ञ आहे आणि माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, अशी भावूक प्रतिक्रिया अनुष्का शर्माने यावेळी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

महत्त्वाच्या  घडामोडी –

भाजप-शिंदे गटासोबत युती होणार का?; मनसे आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले…

“मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधणं भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्याची ठाकरे गटातून हकालपट्टी”

“गाैतम अदानीनंतर आता, अनंत अंबानी, ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल, चर्चांना उधाण”