Home पुणे खरी शिवसेना कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची?, शर्मिला राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

खरी शिवसेना कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची?, शर्मिला राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. यानंतर पक्ष कुणाचा, या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे समोरासमोर आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची?, शिंदेंची की ठाकरेंची?, यातील वाद आता न्यायालयात पोहचला आहे. यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोणताच पक्ष संपत नसतो. शिवसेना पक्षातील खालच्या पदाधिकाऱ्यांची अजूनही बाळासाहेब यांच्यावर निष्ठा आहे. खरी शिवसेना कोणती हे सुप्रीम कोर्ट ठरवेल, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

हे ही वाचा : शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार-काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात बंददाराआड खलबतं; चर्चांना उधाण

दरम्यान, शर्मिला ठाकरे यांनी राज-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे. दोन्ही भावंडं एकत्र आल्यास आनंदच होईल. कितीही मतभेद असले तरी संकटकाळात ठाकरे कुटुंबीय एकत्र येते हे सर्व महाराष्ट्र जाणतो. समोरून एकत्र येण्यासंदर्भात साद आल्यास राज ठाकरे नक्कीच विचार करतील, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ शिंदेंना मोठा धकका; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने केली घरवापसी

… तर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शर्मिला ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई पच्श्चिम द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; दिला आंदोलनाचा इशारा