Home महाराष्ट्र शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; एकनाथ खडसेंचा मोठा गाैफ्यस्फोट

शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; एकनाथ खडसेंचा मोठा गाैफ्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एक मोठं विधान केलं आहे.

शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळेच मागील वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असा मोठा गाैफ्यस्फोट एकनाथ खडसेंनी यावेळी केला. तसेच शिवसेना आणि भाजपची युती तोडण्याचा निर्णयही देवेंद्र फडणवीस यांचाच होता, असंही खडसे म्हणाले.

हे ही वाचा : खरी शिवसेना कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची?, शर्मिला राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

शिवसेना-भाजपची युती तोडण्याच्या महत्वाच्या निर्णयामध्ये देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्यामुळेच शिवसेना भाजपची युती तुटली होती. आणि या निर्णयामध्ये महत्वाची भूमिका ही देवेंद्र फडणवीस यांची होती. तसेच युती तोडण्याचा निर्णय आधीच झालेला होता, मी फक्त घोषणा करण्याचे काम केलं, असं खडसेंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार-काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात बंददाराआड खलबतं; चर्चांना उधाण

एकनाथ शिंदेंना मोठा धकका; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने केली घरवापसी

… तर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शर्मिला ठाकरेंचं मोठं विधान