आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नगरसेवक किंवा नेत्यांना तिकीट देणार नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्यांमुळं चर्चांना उधाण आलं होतं. यावरून आता शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट करत या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
हे ही वाचा : सरकारवर विश्वास ठेवा, तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, संप मागे घ्या; शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं., असं आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 9, 2022
महत्वाच्या घडामोडी –
तमिल थलाइवाजाचा विजयी धमाका; हरियाणावर केली एकतर्फी सामन्यात मात
“भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”
मोठी बातमी! मुंबई पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव; विश्वास नांगरे पाटील यांनाही कोरोना