मुख्यमंत्र्यांवर टीका करताना रावसाहेब दानवेंची जीभ घसरली, म्हणाले…

0
678

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलताना जीभ घसरली आहे. दानवेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीची कबर महाराष्ट्र खोदल्याशिवाय राहणार नाही; भाजप नेत्याचा इशारा

2 महिन्यांपासून कुठेय पठ्ठ्या काहीच सांगू शकत नाही कोणी, असं म्हणत दानवेंनी मुख्यमंत्र्यांना एकेरी संबोधल आहे. तसेच मुख्यमंत्री स्वत:च्या कुटुंबाचे जबाबदार आहेत की 12 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचे, असा सवाल करत दानवेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, या 3 महिन्यात कोणत्या शिवसेना नेत्याला चार्ज दिला असता तर राज्याचा कारभार नीट चालला नसता का? असा सवालही दानवेंनी केला. तसेच बिना मुख्यमंत्र्याचं कुठं राज्य चालतं असत का? असा टोलाही दानवेंनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

‘..तर घरा-दारासकट सगळं सोडून जातो’; भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

“राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?”

2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला औकात दाखवून दिली आहे; धनंजय मुंडेचा पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here