असं कुठं असतं का किरीटजी?; स्वतःच नखाने मारून रक्त काढता, आणि मग नंतर…; रूपाली पाटलांचा घणाघात

0
288

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलीस स्टेशनसमोर शिवसैनिकांनी हल्ला केला. यात सोमय्या यांच्या हनुवटीला दुखापत झाली असल्याचं व्हिडिओत दिसत होतं. मात्र सोमय्या यांच्या हनुवटीला झालेली जखम कृत्रिम असण्याची शंका सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रूपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत किरीट सोमय्यांवर हल्लाबोल चढवला आहे.

हे ही वाचा : शिंदे आजींच्या भेटीवरुन मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले…

असं कुठे असते का किरीटजी, तुमचा संबंध नसताना तुम्ही जाणीवपूर्वक चेतावणी द्यायला जाता, स्वतःच नखाने मारून रक्त काढता आणि नंतर मारले मारले बोंब मारता. कायद्या, सुविधा ,समाज यांना वेठीस धरता हे कोणाच्या सांगण्यावरून ,तुम्ही आहात तरी कोण माजी खासदार छूट ,बेसलेस आरोप करण्याशिवाय आपली ओळख काय? याचा विचार करावा. बाकी महाराष्ट्रात अनेक महत्वाचे प्रश्न आहे ते सामोरे जाऊन सोडवण्याचा पर्यन्त यशस्वी करू या. त्यात हातभार लावा किरीटजी,बघा चांगलं वागणं,चांगला माजी लोकप्रतिनिधी बनता येत का? तुम्ही प्रयत्न केला तर नक्की जमेल ,तुम्ही परप्रांतीय असले तरी महाराष्ट्रातच्या मिठाला जागताल महाराष्ट्राच्या जनतेसाठी., असा हल्लाबोल रूपाली पाटील यांनी सोमय्यांवर केला.

महत्वाच्या घडामोडी –

जबाबदार पदावर असणाऱ्यांनी…; मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याला सुनावलं

“शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या दिल्लीत दाखल, म्हणाले…; आता तुमच्याविरूद्ध…”

थप्पड से डर नही सकता साहब, हनुमान चालिसा से डर लगता है; मनसेचा शिवसेनेला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here