आम्ही बांधावर होतो, तेव्हा पंकजा मुंडे अमेरिकेत होत्या; धनंजय मुंडेंचा टोला

0
382

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

परळी :  नुकसानग्रस्त नागरिकांना वाऱ्यावर सोडून जिल्ह्याचे पालकमंत्री हे पुण्याला गेले आहेत. अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली होती. त्याला सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही तीन वेळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली तेव्हा पंकजा मुंडे या अमेरिकेत होत्या, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला. परळी तालुक्यातील वाण नदी काठच्या गावांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी काल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते.

निसर्गाने प्रकोप दाखविला तरी संसार उघड्यावर पडू देणार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून नुकसानग्रस्त नागरिकाला हवी ती मदत केल्या जाईल, असं आश्वासनही धनंजय मुंडे यांनी वाणटाकळी येथील ग्रामस्थांना दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

जर पोलिसांना प्रियांका गांधी यांना सोडलं नाही तर…; नाना पटोलेंचा इशारा

पूरग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्व कळते असे नाही; अजित पवारांचं प्रत्युत्तर

कोणीही गेलं तरी, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक आपल्यासोबत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“ऑफीसच्या एसीत बसून मोठे लिडर झाले, यांना शेतकऱ्यांचं काय दु:ख कळणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here