Home महाराष्ट्र पूरग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्व कळते असे नाही; अजित पवारांचं प्रत्युत्तर

पूरग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्व कळते असे नाही; अजित पवारांचं प्रत्युत्तर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे हातातून गेले आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात गेले नसल्याचे विधान केले होते. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठवाडा भागात अद्याप मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाहणी  करायला गेले नाहीत, असं विरोधक  सांगत आहेत. त्या भागाची पाहणी केली म्हणजेच सर्व कळते असं नाही. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या त्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी गेले आहेत. आजही ते गेले आहेत. मंत्रालयात बसून व्हीसी घेऊन सर्वांशी संपर्क साधला जात आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांना काय मदत पाहिजे याचा सतत आढावा घेतला जात आहे. जयंत पाटील, शंकरराव गडाख, राजेश टोपे, अमित देशमुख, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे आणि वर्षा गायकवाड हे सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. आम्ही गेल्यावर प्रोटोकॉलप्रमाणे सर्व शासकीय यंत्रणा आमच्या मागे येते. त्यांचे  संपूर्ण दिवसाचे कामकाज ठप्प पडते. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण करू नका, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

कोणीही गेलं तरी, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक आपल्यासोबत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“ऑफीसच्या एसीत बसून मोठे लिडर झाले, यांना शेतकऱ्यांचं काय दु:ख कळणार”

“कोणी कितीही निर्धार करा, जिल्हा बँक राष्ट्रवादीकडेच येणार”

“…तर हे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही”