Home महाराष्ट्र “ऑफीसच्या एसीत बसून मोठे लिडर झाले, यांना शेतकऱ्यांचं काय दु:ख कळणार”

“ऑफीसच्या एसीत बसून मोठे लिडर झाले, यांना शेतकऱ्यांचं काय दु:ख कळणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लातूर : गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.

मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलंच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक मुखवटा होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा चेहरा होता का? असा सवाल सामनात केला होता. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जे लोक ऑफिसमध्ये बसून टीका करतात. अग्रलेख लिहून नेते होतात. त्यांना शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार? हे ऑफिसमधले लीडर आहेत. हे कागदावरचे लीडर आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचं, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते लातूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“कोणी कितीही निर्धार करा, जिल्हा बँक राष्ट्रवादीकडेच येणार”

“…तर हे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही”

“देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीनं दुचाकीस्वारास उडवलं; 3 जण जखमी”

राज ठाकरेंचा आदेश; मनसेची पूरग्रस्त शेतकऱ्यांना ‘ही’ मोठी मदत