Home महत्वाच्या बातम्या राज ठाकरेंचा आदेश; मनसेची पूरग्रस्त शेतकऱ्यांना ‘ही’ मोठी मदत

राज ठाकरेंचा आदेश; मनसेची पूरग्रस्त शेतकऱ्यांना ‘ही’ मोठी मदत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उस्मानाबाद : गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचवली पाहिजे असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार ठाकरे सरकारची मदत मिळण्यापूर्वीच मनसेने पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी शनिवारी उस्मानाबादमधील पीक नुकसानीची पाहणी करत अत्यंत गरजू अशा 25 शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत केली. ज्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दगावली आहे, ज्यांच्या घराचे किंवा शेतीचे नुकसान झाले आहे अशा 25 कुटुंबांना मनसेच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत करत संकटकाळात आधार देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, यावेळी पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन, सरचिटणीस संतोष नागरगोजे, उपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हासंघटक अमरराजे कदम, जिल्हाअध्यक्ष राजेंद्र गपाट यावेळी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवार आमदार निलेश लंकेंच्या घरी, लंके कुटुंब भारावलं”

भाजपाच्या ‘या’ महिला आमदारांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी

शिवसेनेला सोडताना बाळासाहेबांच्या आठवणीने साबणे यांना अश्रू अनावर; म्हणाले…

तारक मेहता का उल्टा चष्मातील नट्टू काका यांचं निधन