आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात जोरदार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. अशातच शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्धव ठाकरे हे आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.
विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे बसलेले असतानाच तिकडे दीपक केसरकर आले आणि मग जोरदार राडा झाला. उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांना थेट जाब विचारला.
हे ही वाचा : “किरीट सोमय्या आक्रमक?; रश्मी ठाकरेंविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल, ठाकरेंच्या अडचणीत वाढ”
तुम्ही शाखा कार्यालय ताब्यात घेताय, हे काही बरोबर नाही. तुम्ही जे करताय ते बरोबर नाही. सत्ता मिळाली तर घ्या आणि व्यवस्थित राहा, असं उद्धव ठाकरे, केसरकरांना म्हणाले. आता या भेटीवरून केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही ज्यादिवशी बसलो त्यादिवशी माझ्या सासूबाई, पत्नीच्या आईंचं निधन झालेलं होतं. त्यामुळे मी उपाध्यक्षांना सांगायला जात होतो की, मला कामातून थोडी सवलत द्या, मला अंत्ययात्रेत जायचं आहे. पण त्यावेळी मला हे सगळं ऐकावं लागलं. ऐकल्याबद्दल दु:ख नाही, केसरकरांनी यावेळी दिली.
कटुता कमी करणं हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. मी काल ज्यावेळेला त्यांना भेटलो तेव्हा ते भावनाविवश झालेले होते. ते काय बोलले, मी त्यांना मानणारा, त्यांच्याबद्दल आदर ठेवणारा मनुष्य आहे. त्यामुळे मी त्यांना काहीच उत्तर दिलेलं नव्हतं. मी फक्त एवढंच म्हटलं की, साहेब मला आपल्याबद्दल आदर आहे. तो आदर मी पक्ष सोडताना देखील दाखवला होता. मी त्यांना सांगितलं होतं की, ज्यावेळेस घर पेटतं त्यावेळेस आग अगोदर विझवायला लागते. कशामुळे लागली हे नंतर बघुया. आधी आपलं घर सुरक्षित ठेवूयात. ऐकलं नाही. ते मोठे आहेत. मी छोटासा मनुष्य आहे, असंही केसरकर म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
अपघात नेमका कसा झाला?; ऋषभ पंतने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला, ओव्हरस्पिडमुळे नव्हे तर…
मलाही तुरूंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला; विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीसांचा गाैफ्यस्फोट